I want to share some quotes which I like and some thoughts come to my mind.
Moment February 28
A moment is a flowing string of pearls.
First a person Imagines it.
Then Experieces it.
And later on Remembers it.
It is the most unreal thing which feels so real.Arundhati
स्पर्शाचे अर्थ
स्पर्श शब्द पण मनाला खूप जवळचा वाटतो. दुरून दरवळलेल्या आशाच्या गाण्याचा कानांना स्पर्श. माणसांचा एकमेकांना होणारा, पक्षांचा, प्राणांचा, फुलांचा स्पर्श. समुद्राच्या किनाऱ्यावर फिरताना पावलांना होणाऱ्या वाळूचा स्पर्श! सर्वच मनाला हवेसे वाटणारे तर कधी नकोसे.स्पर्शाचे ठसे ओला किनारा आपल्या अंगावर थोडाकाळ तरी जपण्याचा प्रयत्न करतो. कितीतरी कवी लेखकांच्या लेखणीच्या "स्पर्शाची जादू" आपल्याला नेहमीच आनंद देते. जगात आलेल्या पहिल्या क्षणापासून रडणारं बाळ आईचा स्पर्श जाणतं.तळहाताचा "magic touch ".
मी कॉलेज मध्ये असताना सई चा स्पर्श सिनेमा आला होता. दृष्टी न लाभलेल्या लोकांच सुंदर दिसणं सुद्धा कसं प्रेमाच्या स्पर्शात असत हे पहिल्यांदाच कळलं. या गोष्टी आपल्याला दृष्टी असल्यामुळे कधी लक्षातच येत नाहीत.
सध्या स्पर्शाचा अर्थ नव्यानी जाणवला. आमच्या जवळच्या एका चर्चमध्ये under preveledged मुलांसाठी फारच चांगला उपक्रम आहे. तिथे shelter मधून ३ ते ५ वयोगटातली मुलं दिवसभरासाठी बसमधून आणतात. त्यांच्यासाठी सकस जेवण, play ground, काळजी वाहाणारे आणि भरपूर प्रेम करणारे शिक्षक अशा बऱ्याच सुविधा उपलब्ध आहेत.
मी जेव्हा त्या शाळेत जायला लागले, तेव्हा खरतर सुरुवातीला थोडा परकेपणा होता.पण थोड्याच दिवसात मी त्या मुलांच्या प्रेमात पडले. ती मुलं आपण शाळेत आल्यावर आपल्याला येउन बिलगतात. कधी माझ्यासाठी चित्र रंगवतात. तर कधी खेळण्याच्या भांड्यांमध्ये माझ्यासाठी खोटाखोटा केक बनवतात. त्यांच्या या निर्व्याज प्रेमच व्याज कितीतरी पट असत हे मनोमन पटतं. आपल्याला बिलगताना आपल्यात त्यांच्या आईचा स्पर्श शोधणारे ते निरागस चेहरे माझ्या कायम लक्षात राहतील.
मग माझ्या मनाच्या ओल्या वाळूत त्याचे ठसे उरतील.
Arundhati
Source picture From microsoft
word clipart
No comments:
Post a Comment