आयुष्य म्हणजे....
file च्या कंटेंट पेक्षा,
कव्हरच जपणं असतं
आयुष्य म्हणजे....
नात्यांच्या कोऱ्या कागदावर,
प्रेमाचे रंग भरणं असतं,
आयुष्य म्हणजे....
कधी वळणावर हळु तर,
एरवी बिनधास्त चालवणं असतं,
आयुष्य म्हणजे....
सर्वस्व पणाला लावून,
अंधारात सुद्धा बाण मारणं असतं,
तर कधी माघार घेवून सुद्धा जिंकणं असतं
रंगमंचावर मेकप बदलून वेगवेगळे रोल करणं असतं
कधी मेनरोलला अंडी तर
गेस्ट अपिअरन्सला वन्स्मोर घेण असतं,
आयुष्य म्हणजे....
कधी सस्पेन्स थ्रिलर तर कधी कॉमेडी
कधी हलकी फुलकी रोमांटिक तर कधी इंटेन्स ट्राजिडी बघण असतं,
ट्रेन च्या डब्यात भेटण्याऱ्यांवर
आयुष्यभराएवढं प्रेम करण असतं,
आयुष्य म्हणजे ...
सुखाच्या मृगजळामागे धावता धावता
ओंजळीतले सुखांचे क्षण निसटून जाणं असतं,
ज्यानी दिलं त्याच्या नजरेनी पाहिलं तर, त्याच्याच स्वरूपात विलीन होणं असतं.....
No comments:
Post a Comment