चिमणी आई
तिच्या पंखांना ओढ फक्त घरट्याची असते. दोन इवलेसे डोळे तिची आतुरतेनी वाट बघत असतात. फक्त गोडच दाण्यांचा घास ती हा चिउचा हा काउचा म्हणत त्यांना भरवते आणि त्यांच्या पेंगणाऱ्या डोळ्यांना चिवचिव अंगाईगीत म्हणून झोपवते. बाहेर पाउस कोसळायला लागतो. इवल्यांना वाटतं की प्रलय आलाय. थरथरणाऱ्या त्या इवल्यांना ती आपल्या पंखांच्या शालीत गुरफटते. ती त्यांच्या कानात सांगते लवकरच थांबेल हे सगळं.आता पाऊस थांबतो. बघता बघता सूर्य ढगातून हसू लागतो. सुंदर सोनेरी किरण त्यांच्यावर मायेचा हात फिरवत असतात.
ती त्यांच्या कानात कुजबुजते आता कडाक्याची थंडी सुरु होते. त्यांना कळत की स्थलांतराशिवाय पर्याय नाही.
आता तिच्या इवल्यांच्या पंखात आत्मविश्वासाची ताकद भरलेली असते.
आज त्यांची भरारी साता समुद्रावरून.
आज त्यांना आभाळ पण ठेंगण दिसत होतं आणि मोठे पर्वत, प्राणी मुंग्यांसारखे.
त्यांची भरारी पाहून तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते.
No comments:
Post a Comment